रस्ते प्रवासी वाहतुकीसंदर्भात समाजातील विविध घटकांची मागणी, त्यांचेकडून वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने त्याचप्रमाणे महामंडळाकडे उपलब्ध असलेली माहिती इत्यादीचे शास्त्रीय पध्दतीने संकलन करण्यात येऊन राज्यातील विविध मार्गावर नवीन बस सेवा सुरु करणे किवा कार्यरत असलेल्या सेवा स्थगित करणे या संदर्भात निर्णय घेण्यात येतात सर्वसाधारणपणे नवीन बस सेवा सुरु करण्याबाबत महामंडळाकडे मागणी आल्यास मागणी करण्यात आलेल्या मार्गावर उपलबध असलेल्या बस सेवा, त्यांना मिळणारा प्रवासी प्रतिसाद, त्या मार्गावर उपलब्ध असलेली प्रवासी क्षमता, व्यापारी / औद्योगिक केंद्र, शेक्षणिक संस्था इत्यादी घटक विचारात घेऊ नवीन बस सुरु करण्याची आवयकता पडताळली जाते आणि तद्नंतर नवीन बस सुरु करण्याच्या मागणीबाबत विभाग नियंत्रकाकडून अंतिम निर्णय घेण्यात येतो़. प्रवासी वाहतुकीसाठी नवीन रस्ता निर्माण झाल्यास तो मार्ग ज्या रस्ते प्राधिकरणाच्या कार्यकक्षेत येतो, अशा प्राधिकरणातील सक्षम अधिका-याचा '' रस्ता रा़. प. प्रवासी वाहतूकीस योग्य असल्याबाबतचा दाखला'' सदर प्रकरणी संबंधित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येते. रा़. प. महामंडळाचे दरवर्षाकरिता वाहतुकीचे नियोजन महामंडळाकडून आगाऊरित्या करण्यांत येऊन त्याची अंमलबजावणी सर्वसाधारणपणे दरवर्षी माहे जुलै दरम्यान करण्यांत येते़. रा़. प. बससेवा सुरु करणे अथवा त्यांचे वेळेत / मार्गात / सेवाप्रकारात बदल करणे या संदर्भात सूचना मागणी नागरिकांनी संबंधित आगार व्यवस्थापक / विभाग नियंत्रक यांचेकडे केल्यास त्याबाबतची तपासणीअंती कार्यवाही कालमर्यादेत महामंडळाकडून करण्यात येते़