संपूर्ण राज्य टप्पा व कंत्राटी प्रवासी वाहतूकीचे एकाधिकार काही अपवाद वगळता फक्त म़ रा़ मा़ प महामंडळास आहेत़ पर्यटन परवाना धारण करणा-या खाजगी वाहनांतून फक्त ऐतिहासिक, धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटन गटाने कंत्राटी पध्दतीवर प्रवास करू शकतात़ यावाहनांना परवाना नसतानांही टप्पा पध्दतीने प्रवासी वाहतूक करण्यात येते़ अशी वाहतूक बेकायदेशीर असून या वाहनांद्वारे प्रवाशांनी प्रवास करू नये़ काळ्या - पिवळ्या रिक्षा, टॅक्सीमधून मधून ३ ते ६ प्रवाशांच्या गटाने वाहतूक ठरावीक क्षेत्रामध्ये करण्याची परवानगी असते़ मात्र, अशा वाहनांकडून परवान्यातील अटी व शर्तीच उल्लंघन करून आणि निर्धारीत केलेल्या क्षेत्राबाहेर जाऊन प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूक करण्यात येते़. जीप्स, टेम्पो, टॅक्टर इत्यादि वाहनांना फक्त मालवाहतुकीची परवानगी असते़. अशा वाहनांतून प्रवास करणे बेकायदेशीर आहे़ उपरोक्त अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांतून प्रवास करणे बेकायदेशीर आहे़ अशा वाहनांतून प्रवास करतांना प्रवासी आढळल्यास त्यांचा खोळंबा होऊन गैरसोय होऊ शकते़ तेव्हा प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी फक्त रा़ प बसनेच प्रवास करावा़