Welcome to MSRTC   Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीचे पास -

अ) दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक सवलतीचे पास :

पूर्वी दररोज प्रवास करणार्या प्रवाशांमध्ये नोकरदार वर्ग व व्यापारी वर्ग असे वर्गीकरण करुन त्यांना सुटटीचे दिवस वगळून प्रवास करण्यासाठी सवलतीचा पास देण्यात येत असे. तथापि महामंडळांने ठराव क्र. ९८.०५.२१, दिनांक २१.०५.१९९८ नुसार सदर योजनेमध्ये सुधारणा केली असून २० दिवसाच्या दुहेरी प्रवासाचे भाडे आकारुन मासिक पास देण्यात येतो.

ब) दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रैमासिक सवलतीचे पास :

पत्र क्र.राप/ वाह/ चालन/ सवलत/ त्रैमासिक पास/ २४५९ दिनांक २३ एप्रिल, २०१० नुसार दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५० दिवसांचे दुहेरी प्रवास भाडे भरुन तीने महिने प्रवास करण्याची सवलत दिनांक २ मे २०१० पासून देण्यात आली आहे. रातराणी सेवा जादा बसेस - प्रवाशांचा रात्रीच्या बसमधून प्रवास करण्याचा वाढलेला कल विचारात घेऊन रात्रीच्या जादा बसेस सोडण्यात येतात. यापूर्वी रात्रीच्या जादा बसेस सोडण्यात येत नसत. प्रासंगिक करारावर सुध्दा रात्रीच्या जादा बसेस देण्यात येतात.

विविध सवलती -

रा.प.महामंडळांकडून ३२   विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडयात सवलती देण्यात येत आहेत. सदर सवलतींपोटी सन २०२२ -२३  या वित्तिय वर्षात शासनाकडून येणे असलेल्या १५७५ .४२  कोटी इतक्या मुल्यांची सवलत देण्यात आलेली आहे. रा.प. बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना -

अ. क्र. सवलतींचा तपशील शासन निर्णय क्रमांक  सवलत अनुज्ञेय बससेवा प्रकार प्रवासभाडयातील सवलत टक्केवारी
स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८

साधी, निमआराम, आराम १००%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८




साधी, निमआराम, आराम १००%
अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इ. ५वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्दयार्थीनीसाठी  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८






साधी १००%  
शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार-शिवशाही (शयनयान) बस ८००० कि.मी.पर्यंत गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८
 





साधी, निमआराम,
शिवशाही ( आसनी) शिवशाही  (शयनयान)
१००%  
राज्यातील ६५ वर्षावरील ते ७५ वर्षापर्यंतचे    जेष्ठ नागरिक  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - ०८२२  / प्र. क्र. २१८ / परी - १,             
  दि- ०६ -०९ -२०२२ 
 



सर्व प्रकारच्या बसेस 

 
५०%
 राज्यातील ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक    गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - ०८२२  / प्र. क्र. २१८ / परी - १,             
  दि- ०६ -०९ -२०२२ 
 


सर्व प्रकारच्या बसेस 
१००%  --
विद्यार्थी मासिक पास सवलत - 
शैक्षणिक / तांत्रिक
 गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८






साधी ६६.६७%  
विद्यार्थ्यांना विशेष बस सेवेद्वारे  देण्यात येणारी सवलत  वाहतूक खाते परिपत्रक क्र. ०५ /२०२२ , क्र. राप / वाह / चालन / सामान्य / विशेष बस / १०५० , दि- ११-०५-२२




साधी ५०%  
विद्यार्थ्यांना मोठया सुटृीत मुळ गावी येणे जाणे, परिक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या/येण्या साठीची सवलत वाहतूक खाते परिपत्रक क्र. ५९  , क्र. राप / वाह / ५९ / वा. ३७ / ७८ ,  दि- ०१ -०३ -१९७८ 
गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८





साधी ५०%  
१० ४० % अथवा त्यापेक्षा अधिक अंध व अंपग व्यक्ती
गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८
साधी, निमआराम, शिवशाही आसनी  ७५%
७०%
 
११ ६५ % अथवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असलेल्या  अंध व अंपग व्यक्ती यांचे  मदतनीस  
गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८

साधी, निमआराम शिवशाही आसनी  ५०%
४५%
 
१२ क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठी  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८
साधी ७५%
१३ कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी गृह विभाग शासन निर्णय क्र. 
एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/
परी - १, दि- ०९-१०-१८




साधी ७५%
१४ कुष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठी   गृह विभाग शासन निर्णय क्र. 
एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/
परी - १, दि- ०९-१०-१८


साधी ७५% 
१५ राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी  वाहतूक खाते परिपत्रक क्र. ५९  , क्र. राप / वाह / ५९ / वा. ३७ / ७८ ,  दि- ०१ -०३ -१९७८  

साधी ३३.३३%  
१६ विद्यार्थी जेवणाचे डबे   वाहतूक खाते परिपत्रक क्र. ५९  , क्र. राप / वाह / ५९ / वा. ३७ / ७८ ,  दि- ०१ -०३ -१९७८ 

साधी १००%  
१७ अर्जुन,  द्रोणाचार्य,   पुरस्कार प्राप्त खेळाडू  गृह विभाग शासन निर्णय क्र. 
एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/
परी - १, दि- ०९-१०-१८

साधी, निमआराम, आराम,वातानुकुलित १००%
   दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती
पुरस्कार प्राप्त खेळाडू 


 गृह विभाग शासन निर्णय क्र. 
एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/
परी - १, दि- ०९-१०-१८
 साधी, निमआराम,
आराम
 १००%
१८ आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत  आ . से . पु / १०९६/प्र. क्र. ६६ /का . ५, दि - २३-०२-२००० साधी, निमआराम, आराम १००%
१९ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८

साधी, निमआराम, आराम १००%
२० पंढरपूर आषाढी/कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचे मान मिळांलेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी मोफत प्रवास सवलत  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - ३४०५  / प्र. क्र. २५/ परी - १, दि- ०९-११ -२००५   साधी, निमआराम १००%
२१ विद्यमान विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १९००  / प्र. क्र. १६७ /
परी - १, दि- १२  -०३  -२००१ 
सर्व प्रकारच्या बसेस  १००%  
२२ माजी विधान मंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत   गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १९००  / प्र. क्र. १६७ /
परी - १, दि- १२  -०३  -२००१


सर्व प्रकारच्या बसेस
१००%  
२३ रेसक्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरिता गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८  

साधी ६६.६७%  
२४ मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिक दृष्टया अपंग विद्दयार्थ्यांच्या सहलीसाठी गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८ 

साधी ६६.६७%  
२५ अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ति व त्यांचे  एक साथीदार  ईडीडी-२००५ / प्र क्र.  ३५६ /
सुधार -०२, दि- १९-०५-२००९
साधी,  निमआराम १००%
२६ सिकलसेल रुग्ण  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८ 

साधी १००%
  दुर्घर आजार (HIV)रुग्ण  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८

साधी १००%
  डायलेसिस रुग्ण  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८ 

साधी १००%
  हिमोफेलिया रुग्ण  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८ 

साधी १००%
२७ राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती  गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८ 

साधी, निमआराम,आराम १००%
२८ कौशल्य सेतू अभियान योजने अंतर्गत लाभार्थी ६ महिने पर्यंत कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमा करिता गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी - १०१७ / प्र. क्र. ५२५/ परी - १, दि- ०९-१०-१८  
साधी ६६.६७%  
२९ शैक्षणिक खेळ    वाहतूक खाते परिपत्रक क्र. ५९  , क्र. राप / वाह / ५९ / वा. ३७ / ७८ ,  दि- ०१ -०३ -१९७८ 
साधी ५०%  
३० शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना वाहतूक खाते परिपत्रक क्र. ०४   , क्र. राप / वाह / सवलत /        दि- २५  -०४  -२०१८ 

सर्व प्रकारच्या बसेस  १००%  
 ३१   महिला सन्मान योजना   गृह विभाग शासन निर्णय क्र. 
एसटीसी - ०३२३  / प्र. क्र. १३५ / परी १, दि- ०३ -०४ -२०२३ 
  


 सर्व प्रकारच्या बसेस   ५० %  
 ३२   पोलीस/ जेल मोटर  वॉरंट 


 गृह विभाग शासन निर्णय क्र. 
एसटीसी - १९७८   / प्र. क्र. ३६०  /पोल- ५  , दि- २७  -०९  -१९७९  
 
 साधी , निमआराम   १००%  

विविध सामाजिक घटकांना अनुज्ञेय असणाऱ्या सवलतधारक लाभार्थीची संख्या व वर्षनिहाय एकूण सवलत मुल्य -

क्र. वर्ष लाभार्थींची संख्या (कोटी) सवलतीची एकूण रक्कम ( कोटी)    
२०१९ -२०२०  ३७.००  १७०६.६०     
२०२० -२०२१ ८.६१  ३७७.७३     
२०२१ -२०२२  ७.७३  ३८९.८५     
२०२२ -२०२३  २२.३५  १५७५.४२     


Picture
  • Welcome to the Maharashtra State Road Transport Service Support System
Picture

How may I help You?
Please Select from Below

File a complaint Departments Sugestion Related to the Website FAQ
For any other queries kindly contact our customer care number. टोल फ्री हेल्पलाईन : १८०० २२ १२५० Thank You