 
 डॉ. माधव कुसेकर  (भा.प्र.से)
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक 
म. रा. मा. प.  महामंडळ  
            
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्यातील जनतेस पुरेशी, किफायतशीर, नियमित व कार्यक्षम सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व खेड्यांपर्यंत सेवेद्वारे पोहोचलेले देशातील एकमेव राज्य परिवहन महामंडळ आहे. महामंडळ राज्याच्या जनतेस तालुक्याच्या व महत्वाच्या ठिकाणी असलेल्या २४७ आगारे व ५७८ बसस्थानकांमार्फत वाहतूक सेवा देत आहे.
प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महामंडळाने अभिनव योजना अंमलात आणल्या असून प्रामुख्याने बसेसच्या रचनेत व रंगसंगातील बदल करण्यात आलेला आहे. २x२ आसन व्यवस्थेसह परिवर्तन बसेस, अधिक आरामदायी आसनव्यवस्थेसह निमआराम बसेस महामंडळाने पुरविलेल्या आहेत. प्रवाशांचे आकर्षक ठरलेल्या शिवनेरी या वातानुकूलित बसेसच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. या शिवाय ३२ आसनी मिडी बसेस ग्रामीण व अतिदुर्गम भागात लोकप्रिय झाल्या असून या बसेसच्या संख्येत वाढविण्याच्या भविष्यात करण्यात येणार आहे. बसताफा अधिक कार्यक्षम असणार्या दृष्टीकोनातून बसेसचे आयुर्मान १० वर्षावरुन ८ वर्षे करण्याचा निर्णय महामंडळाने घेतलेला आहे व याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.
प्रवाशांना राज्य परिवहन सेवांकडे आकर्षित करण्यासाठी तसेच आज जी वाहतूकीशी समारोप स्पर्धा करण्यासाठी प्रवासाभिमुख असलेल्या वार्षिक सवलत कार्ड, मासिक पास,त्रैमासिक पास, आवडेल तेथे प्रवास इत्यादी योजना दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत. येत्या काही महिन्यांत प्रवाशांना तिकिट देण्यासाठी इलेक्ट्रीक तिकिट इश्यु मशीनचा वापर राज्यातील सर्व वाहकांमार्फत केला जाणार आहे. तसेच सुमारे २१५ महत्वांच्या बसस्थानकांवरून संगणकीय आरक्षण सुविधा नजिकच्या काळात विस्तारीत करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जानेवारी २०१० पासून “इ-तिकिट” सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तर मोबाईल वरुनही आरक्षण याचा पर्याय प्रवाशांना महामंडळाने उपलब्ध करुन दिलेला आहे.
बसेसची स्वच्छता, सेवेची नियमीतता, सौजन्यशील वागणूक, अपघातविरहीत व सुरक्षित सेवा यासाठी महमंडळ सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. प्रवाशांचे मार्गदर्शनासाठी १८०० २२ १२५० वर निशुल्क दूरध्वनी सेवा (Toll Free) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 
प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महामंडळ कटीबद्ध आहे. राज्यात किफायतशीर, सामान प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य महामंडळास सातत्याने मिळेल अशी आशा व्यक्त करतो. सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी एस.टी.नेच प्रवास करावा.
धन्यवाद !