Welcome to MSRTC   Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

अ) अभिक्रम प्रशिक्षण -- कालावधी ४८ दिवस व ८० दिवस 

चालकाच्या जागेसाठी निवड ही कसोशीने होण्यासाठी उमेदवारांची प्रादेशिक छाननी समितीच्या कार्यवाही आधी विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय कर्मचारीवर्ग अधिकारी व वाहतूक निरिक्षक (प्रशिक्षण) यांनी अंर्जाची छाननी करावयाची अंसते व तसेच उमेदवारांच्या वाहन चालविण्याच्या क्षमतेबाबत प्राथमिक चाचणी  रा प मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी , पुणे येथे संगणकीय वाहन चालन चाचणी पथावर ( ADTT ) घेण्यात येते  या चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची नंतर प्रादेशिक छाननी समितीने मुलाखत / चाचणी घ्यावयाची अंसते़ या समितीने निवड केलेल्या चालकांची शारिरिक दृष्टया वैद्यकिय तपासणी करण्यात येते़ त्या नंतर चालक पदाचे ज्या उमेदवारांना  अवजड वाहन चालवण्याच्या ०३ वर्षाचा  अनुभव  असेल अशा चालकांना ४८ दिवस व ज्या उमेदवारांना  अवजड वाहन चालवण्याच्या ०१ वर्षाचा  अनुभव  असेल ८० दिवस सेवापूर्व / अभिक्रम प्रशिक्षण देण्यात येते अभिक्रम प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षित उमेदवारांची यंत्र अभीयंता (चालन), विभागीय वाहतूक अधिकारी व वाहतूक निरिक्षक (प्रशिक्षण) ही समिती वाहन चालविण्याची अंतिम चाचणी घेते़ अंतिम चाचणीत जे उमेदवार उत्तीर्ण होतात त्यांना रोजंदार चालक म्हणून नियुक्त करण्यात येते़

ब) उजळणी प्रशिक्षण -- कालावधी 1 आठवडा

चालकांना उजळणी प्रशिक्षणासाठी बोलविण्याबाबत खालील सुचना कार्यान्वित आहेत.

1) ज्या चालकांची 10 वर्षे विंत्र्वा कमी सेवा महामंडळात झाली आहे अंशा चालकांना दर 2 वर्षातून एकदा उजळणी प्रशिक्षण देणे़

2) ज्या चालकांची 10 वर्षापेक्षा जास्त सेवा महामंडळात झाली आहे अंशा चालकांना दर 5 वर्षातून एकदा उजळणी प्रशिक्षण देणे़

हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्ष वाहन चालविण्याच्या सुधारणेवर आधारित असतो़ ज्यामध्ये चालकाचे दोष शोधून अंथवा चालकाने वाहन चालवित अंसतांना कोणतीही वाईट सवय आत्मसात केली असल्यास, ती त्या चालकाच्या नजरेस आणून देउन सुधारणात्मक प्रशिक्षण देण्यात येते़

क) अपघात प्रवण पाठयक्रम प्रशिक्षण -- कालावधी 10 दिवस

कोणत्याही प्राणांतिक अंपघात करणा-या चालकाला कामावरुन त्वरीत उतरविण्यात येते आणि त्याला 10 दिवसांच्या अंपघात प्रवण पाठ्यक्रम प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते़ चालकाकडून ज्या दोषामुळे अंपघात झाला तो दोष सुधारण्यासाठी वाहन चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून सुधारणात्मक प्रशिक्षण देण्यात येते़ अभिक्रम पाठ्यक्रम, उजळणी पाठ्यक्रम व अंपघात प्रवण पाठ्यक्रम यांचे संरचनात्मक पाठ सर्व विभागीय प्रशिक्षण शाळांना पुरविण्यात आले आहेत. चालक प्रशिक्षण कालावधीत प्रत्यक्ष वाहन चालविण्याचे प्रशिक्षण योग्य प्रकारे होण्यासाठी प्रशिक्षण वाहनात एका वेळेस 15 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी पाठविण्यात येऊ नयेत अंशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच वाहतुकीच्या  कोंडीमध्ये प्रत्यक्ष वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याबाबत नियम घालून देण्यात आले आहेत.

 

 

 

Picture
  • Welcome to the Maharashtra State Road Transport Service Support System
Picture

How may I help You?
Please Select from Below

File a complaint Departments Sugestion Related to the Website FAQ
For any other queries kindly contact our customer care number. टोल फ्री हेल्पलाईन : १८०० २२ १२५० Thank You