Welcome to MSRTC   Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

वाहतूक खाते परिपत्रक क्र. ०६/२०२१ पत्र क्र. राप / वाह / चालन / सा-८८/भाडेवाढ / ४२२० दिनांक २५.१०. २०२१ अन्वये रा प महामंडळाच्या विविध बससेवांचे प्रतीटप्पा दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन टप्पा दरपत्रकाप्रमाणे येणाऱ्या विशेष बससेवेकरिता सुधारीत दर,अटी व शर्ती लागू करण्यास सक्षम प्राधिकारी यांनी मंजुरी दिलेली आहे. सदरचे दर दिनांक १३/०५/२०२२ (दिनांक १२/०५/२०२२ व दिनांक १३/०५/२०२२ च्या मधील मध्यरात्रीपासून) पासून अंमलात येतील.

विशेष बससेवा उपलब्ध करून देणेकरिता दर,अटी व शर्ती(कार्यपद्धती) खालीलप्रमाणे आहे.

१. . विशेष बससेवा आरक्षित करणेसाठीचा हंगाम - यापूर्वी नैमित्तीक कराराच्या बसेससाठी गर्दीच्या हंगामासाठी व कमी गर्दीच्या हंगामासाठी असे दोन स्वतंत्र दर निश्चित करण्यात येत होते, यामध्ये बदल करण्यात येत असून विशेष बस आरक्षित करणेसाठी दोन्ही हंगामासाठी म्हणजेच पूर्ण वर्षासाठी एकच दर आकारणी करण्यात यावी.

. सेवाप्रकारानुसार प्रति कि.मी. दर :-

२.१ यापूर्वी साध्या बसेससाठी ४०,५० व ६५ अशा विविध आसनक्षमतेनुसार दर निश्चित करण्यात आले होते. मात्र या बसेस चालनात नसल्याने रा प महामंडळाकडे सध्या जास्त  संख्येने चालनात असलेल्या साध्या बसेसची आसनक्षमता (४५ आसने)विचारात घेऊन दर  निश्चित करण्यात आले आहेत.मिडी बसेस चालत नसल्याने मिडी बसेसचे दर निश्चित करण्यात आले नाहीत. सध्या चालनातील निमआराम बसेसची आसनक्षमता ३४ इतकी आहे. मात्र भविष्यात घेण्यात येत  असलेल्या निमआराम बसेसची आसनक्षमता ४४ इतकी असल्याने निमआराम सेवेचे दर ४४ आसनक्षमतेनुसार ठरविण्यात आले आहेत.विनावातानुकूलित शयन आसनी बसेस मर्यादीत संख्येने उपलब्ध असल्यामुळे या बसेस लांब / मध्यमलाम्ब पल्ल्याच्या मार्गावर आरक्षण सुविधेसह चालनात असल्यामुळे या बसेस विशेष बस आरक्षित करण्यात येऊ नयेत. शिवशाही (शयन) बसेस चालनात नसल्यामुळे या बससेवेचे दरनिश्चित  करण्यात आले नाहीत.

२.२ रा.प. वाहतुकीतील सेवा प्रकारानुसार विशेष बस देण्यात येणाऱ्या बसेसचे एकेरी व दुहेरी फेरी करिता आकारावयाचे प्रति किमी खालीलप्रमाणे आहेत.

२.३ दुहेरी व एकेरी फेरीसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे :-

कारावयाचे प्रति किमी खालीलप्रमाणे आहेत.

२.३ दुहेरी व एकेरी फेरीसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे :-

सेवेचा प्रकार व आसनक्षमता दुहेरी फेरीसाठी दर रु.
(पूर्ण वर्षासाठी)
एकेरी फेरीसाठी दर रु.
(पूर्ण वर्षासाठी)
अ) साधी बस (४५ आसानपर्यंत) ५५.०० ८३.००
ब) निआराम सेवा (४४ आसनापर्यंत) ७०.०० १०४.००
क) वातानुकूलित शिवशाही (आसनी) ४४ आसनापर्यंत ७२.०० १०९.००
ड) वातानुकूलित शिवनेरी (४३ आसनापर्यंत) १००.०० १४९.००

२.४ विध्यार्थी सवलतीचे दर -महाराष्ट्र शासन निर्णाणय क्र. एसटीसी -३४०१ /सीआर-४२/भाग-१ /परि-१ दिनांक ०५ डिसेंबर २००५ अन्वये शैक्षणिक संस्थांना सहलीकरिता विशेष बससेवेच्या दरात ५० % सवलत दिली आहे. यानुसार शैक्षणिक संस्थांना विशेष बससेवेच्या दरात ५० % सवलत देऊन ५० % दराने येते. उर्वरित ५० % रक्कमेची प्रतिपूर्ती महामंडळास शासनाकडून करण्यात येते. सदरची सवलत ठेवण्यात येईल. शैक्षणिक संस्थांना देण्यात येणाऱ्या सध्या बसेसचे दर खालीलप्रमाणे रहातील :-

 सेवा प्रकार आसन क्षमता सर्वसाधारण प्रवाशांकरिता विशेष बससेवेचा प्रति कि.मी.दर शैक्षणिक संस्थांना ५० % सवलत देऊन आकारावयाचे प्रति कि.मी. ५० टक्के दराने शासनाकडून प्रतिपूर्तिसाठी मागावयाचे प्रति कि.मी. दर
साधी बस ४५ ५५.०० २७.५०* २७.५०
(*अंतिम आकारणी १ रुपयाच्या पटीत करण्यात यावी.)

 

सध्या शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांना निमआराम,वातानुकूलित बसेस विशेष बससेवा सवलतीच्या दराने देण्यात येत नाहीत.तथापि महाविद्यालयीन विद्यार्थी व काही खाजगी शैक्षणिक शाळा यांच्याकडून उच्च दर्जाच्या बसेसची मागणी करण्यात येते. परंतु निमआराम,शिवशाही बसेस या पूर्ण दराने विशेष बस घ्याव्या लागत असल्याने यासाठी शैक्षणिक संस्थां तयार होत नाहीत व खाजगी बसेस आरक्षित करण्याकडे शैक्षणिक संस्थांचा कल वाढत आहे. याकरिता शैक्षणिक संस्थांना विद्यार्थी सहलीसाठी निमआराम, शिवशाही बस उपलब्ध करून देण्यात याव्यात. याची आकारणी खालीलप्रमाणे करण्यात यावी.

प्रथमतः शिवशाही बससेवेचे कि.मी. आकार, वस्तु व सेवाकर, चालकाचा अतिकालीक भत्ता,पथकर, पार्किंग चार्जेस इत्यादी सर्व अनुषंगीक खर्चाचे देयक तयार करण्यात यावे.सदर देयकांमधून साध्या बसद्वारे तेवढेच कि.मी. चालविले असलेबाबत गृहीत धरून कि.मी.आकार वजा करणेत यावा. उर्वरीत रक्कम पक्षकाराकडून वसूल करण्यात यावी. याबाबत अधिक स्पष्टता येणेसाठी खालीलप्रमाणे उदाहरण देण्यात येत आहे.

बस प्रकार चालनीय कि.मी. प्रति कि.मी.दर. कि.मी.
आकार
अपघात सहाय्यता निधी वस्तु व सेवाकर पथकर चालकाचा अति.भत्ता देयकाची एकूण रक्कम
शिवशाही बस देयक ३०० ७२.०० २१६०० ५० १०८० १२०० ७२० २४६५०
साधी बस
(सवलतीचे दरानुसार)कि.मी.
आकार
३०० २७.५० ८२५० -- -- -- -- ८२५०
साध्या बससेवेचा
कि.मी. आकार वजा
करून शैक्षणिक संस्थांकडून आकारणी करावयाची रक्कम
३००   १३३५० ५० १०८० १२०० ७२० १६४००
शासनाकडे मागवायची सवलत प्रतिपूर्तीची रक्कम
 
            ८२५०

शैक्षणिक संस्थांकडून साध्या बसच्या सवलतीची रक्कम वजा करून उर्वरीत रक्कम वसूल करण्यात यावी.शाशसनाकडे फक्त साध्या बसची सवलतीची रक्कमेची प्रतिपूर्तीची मागणी करण्यात यावी.

विद्यार्थी सवलतीचे दर फक्त महाराष्ट्र राज्यात व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच लागू राहतील.इतर राज्यात व इतर राज्यातील विध्यार्थ्यांना सवलतीचे दराने विशेष बस देऊ नये.मात्र आंतरराज्य शैक्षणिक सहलींसाठी महाराष्ट्र राज्यात कार्यन्वित असलेल्या सवलत पात्र शैक्षणिक संस्थांच्या विदयार्थ्यांना विशेष बसगाड्या देण्याची पद्धत पत्र क्र. राप/वाह /सामान्य-८८/नैक / १६४० दिनांक २०.०३.२००१ मधील सूचनांप्रमाणे राहील.

शैक्षणिक सहलींसाठी विदयार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बसेसबाबत पत्र क्र. राप / वाह / चालान / सा-८८/ नै.क./६६४३ दिनांक ०६ डिसेंबर २००५ मधील सूचनांनुसार बसेसची संख्या व कि.मी. यावरील मर्यादा रद्द करण्यात आली आहे.शैक्षणिक संस्थांच्या मागणीनुसार बसेस पुरवण्यात याव्यात.

दिवसाची गणना- सर्व प्रकारच्या विशेष बससेवा ज्या वेळेपासून पक्षकारास हवी आहे त्या वेळेपासून २४.०० तास अशी गणना करण्यात येईल. तसेच १२ तासांसाठी बस आरक्षीत केल्यास ज्या वेळेपासून पक्षकारास विशेष बस हवी आहे त्या वेळेपासून १२.०० तास अशी गणना करण्यात यावी. तसेच बस सुटण्याची वेळ आगाराचे मुख्यालय असलेल्या स्थानकापासून व परत येण्याची वेळ आगाराचे मुख्यालय असलेल्या बसस्थानकापर्यंत गणना करण्यात यावी.

४. किमान आकार - सर्व प्रकारच्या (साधी,निमआराम,शिवशाही व शिवनेरी) बससाठी २४.०० तासासाठी किमान ३०० कि.मी. ची आकारणी करण्यात यावी. बऱ्याच वेळा पक्षकारांना कमी अंतरासाठी व कमी कालावधीसाठी बसेसची आवश्यकता असते. ज्यामध्ये बसेस २४ तास तसेच ३०० कि.मी. पर्यंत वापर करणे शक्य होत नाही. त्याअनुषंगाने परिपत्रक क्र.रॅप / वाह / चालन / स-८८ / नै.क. /७८२२ दिनांक १९ डिसेंबर २०१३ अव्यये दआलेल्या सूचना यापुढेही लागू राहतील.सदरची सवलत सर्व सेवा प्रकारच्या विशेष बससेवेसाठी लागू राहील.


४.१ आरक्षित बस १२.०० तासांचे आत परत आल्यास किमान आकार २०० की.मी.आकारणी करण्यात यावी.

४.२ आरक्षित बस १२.०० तासांचे आत परत आल्यास, पंरतु प्रत्यक्ष कि.मी. २०० पेक्षा जास्त असल्यास प्रत्यक्ष कि.मी.ची आकारणी करण्यात यावी.

४.३ आरक्षित बस १२.०० तासानंतर बस आल्यास किमान ३०० कि.मी. किंवा प्रत्यक्ष कि.मी. यामधील जे जास्त असतील त्या कि.मी.प्रमाणे आकारणी करण्यात यावी.

४.४ पक्षकाराने घेतलेली विशेष बस २४.०० तासानंतर आल्यास त्यास वाढीव तासांसाठी प्रति तास ४० कि.मी. या प्रमाणे आकारणी करण्यात आवि. सदरची सवलत ४ तासापर्यंत लागू राहील. ४ तासापेक्षा जात व १२ तासापर्यंत बस उशिरा आल्यास वाढीव २०० कि.मी.ची आकारणी करण्यात यावी.बस १२ तासापेक्षा उशीर आल्यास तो दुसरा दिवस (२४.०० तास) धरून किमान ३०० कि.मी.ची आकारणी करण्यात यावी.


५. बस रद्द करणे - पक्षकाराने आरक्षित केलेली विशेष बससेवा काही कारणाने रद्द करण्यात आल्यास सर्व प्रकारच्या बसेसची २४ तास पूर्वी रद्द करण्याची मागणी केल्यास रु. १०००/- प्रति मागणी अर्जासाठी आकारणी करणेत यावी. २४ तासापर्यंत विशेष बस मागणी रद्द केल्यास रु. २०००/ आकारणी करण्यात यावी.याव्यतिरिक्त वातानुकूलित बसेसची नियमानुसार वस्तू व सेवाकरची आकारणी करण्यात यावी. विनावातानुकूलित  बसेससाठी वस्तू व सेवाकरची आकारणी करण्यात येऊ नये.

५.१ जर बस आगारातून बाहेर पडून पक्षकाराने मागणी केलेल्या ठिकाणापर्यंत बस पोह्चल्यानंतर रद्द केल्यास चालविण्यात आलेले प्रत्यक्ष कि.मी. आकार अधिक बस रद्द करणेसाठीचा आकार रु.२०००/- आकारणी करण्यात यावी.याव्यतिरिक्त नियमानुसार वातानुकूलित बसेससाठी वस्तू व सेवाकराची आकारणी करण्यात यावी.

५.२ सामान्य स्थायी आदेश क्र. १२०१ मधील तरतुदीनुसार एखादया नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पक्षकाराच्या कुटुंबातील व्यक्तीच्या निधनामुळे पक्षकारास विशेष बस रद्द करावयाची झाल्यास कोणताही आकार न आकारता आरक्षित विशेष बस रद्द करण्याची मुभा देण्यात येत आहे. पक्षकारास तारीख बदलून पुढील तारीख घ्यावयाची असल्यास,घटनेच्या तारखेपासून पुढील कोणताही प्रकारचा आकार न आकारता पुढील तारीख बदलून घेणेची मुभा देण्यात येत आहे.


६. विशेष बससेवेची आरक्षित तारीख बदलणे - कोणत्याही कारणास्तव पक्षकारास आरक्षित विशेष बससेवेची तारीख बदलून पुढील तारीख आवश्यक असल्यास त्याकरिता कोणताही आकार आकारणी न करता पुढील तारखा बदलून देण्याची मुभा देण्यात येत आहे.

७. पथकर - आरक्षित करण्यात आलेल्या विशेष बसेस या विविध मार्गावरून मार्गक्रमण करीत असताना मार्गातील पथकर भरावे लागतात. सर्व रा.प. बसेसना ई -टॅग बसविण्यात आले असल्यामुळे मार्गातील पथकर हे ई -टॅग द्वारे भरले जातात.तदअनुषंगाने मार्गात भराव्या लागणाऱ्या पथकाराची एकूण रक्कम पक्षकाराकडून अंतिम देयकातून वसूल करण्यात यावी. त्याकरिता E-Portal वरून ई-टॅग द्वारे भरण्यात आलेल्या रक्कमेची माहीती घेण्यात यावी.

. इतर कर व आकार - आरक्षित करण्यात आलेल्या विशेष बसेस या पक्षकाराने मागणी केल्याप्रमाणे त्याचे इच्छित स्थळापर्यंत देण्यात येतात.पक्षकाराने निश्चित केलेल्या ठिकाणी रा.प. बसेस नेताना त्या ठिकाणी लागू असलेले प्रवेश कर भरावे लागतात, वाहनांची संख्या वाढली असल्यामुळे तालुका ठिकाण, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळी व मोठ्या शहरात रा.प.बसेस पार्किंग करीत निश्चित केलेल्या ठिकाणी उभी करावी लागतात.वाहने उभी करणेसाठी पार्किंग आकार भरावा लागतो.तरी प्रवेश कर / पार्किंग आकार पक्षकाराने त्या त्या ठिकाणी रोखीने भरणे आवश्यक राहील.

९. वस्तु व सेवा कर (GST) - आरक्षित करण्यात आलेल्या विनावातानुकूलित विशेष बसेससाठी वस्तू व सेवाकरांची आकारणी करण्यात येऊ नये.आरक्षित करण्यात आलेल्या वातानुकूलित विशेष बसेसची केंद्र शासनाने ठरवून दिलेला सेवाप्रकार निहाय वस्तू व सेवाकर वसूल करून तो शासनास भरणा करण्यात यावा.

१०.अपघात सहायता निधी - विशेष बससेवेसाठी अपघात सहायता निधी आकारणीबाबत वाहतूक खाते परिपत्रक क्र. ०७/२०१६ दि.३१.०३.२०१६ अन्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार प्रतिबास प्रतिदिन रु.५०/- आकारणी करणेत यावी.

१२.खोळंबा आकार - आरक्षित विशेष बससेवेसाठी किमान कि.मी. ची आकारणी करण्यात येत असल्यामुळे खोळंबा आकार माफ करण्यात आला आहे.सदरची सवलत यापुढेही सुरु ठेवण्यात येत आहे.

१२.चालकाचा अतिकालीक भत्ता - आरक्षित करण्यात आलेल्या विशेष बससेवेसाठी किमान ३०० कि.मी. ची आकारणी करण्यात येत असल्यामुळे चालकाचा अतिकालीक भत्ता आकार माफ करण्यात आला आहे.सदरची सवलत यापुढेही सुरु ठेवण्यात येईल.शैक्षणिक सहलींसाठी देण्यात येणाऱ्या विशेष बसेस सवलतीच्या दराने देण्यात येत असल्याने चालकाचा होणारा अतिकालीक भत्ता पक्षकाराकडून वसूल करण्यात यावा.

१३.अधिक प्रवासी बोजा -

१३.१ साध्या बससेवेमधून आसन क्षमतेपेक्षा २५ % अधिक प्रवासी उभ्याने नेण्याची सवलत यापुढेही चालू राहील.तथापी,शैक्षणिक सहलीसाठी देण्यात येणाऱ्या बसेस,निमआराम,शिवशाही,शिवनेरी, बससेवेसाठी तसेच सर्व प्रकारच्या आंतरराज्य मार्गावरील विशेष बससाठी हि सवलत लागू राहणार नाही.

१३.२ पक्षकाराने विहित मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी नेल्यास ते विनातिकीट प्रवासी समजले जातील व खालील दराने येणाऱ्या दंडास ते पात्र होऊन तो अधिक बोजा (जादा भार )म्हणून समजला जाईल व त्याचा आकार पक्षकाराकडून वसूल करण्यात यावा.

एकेरी फेरीसाठी प्रति कि.मी. प्रति प्रवासी २९० पैसे
दुहेरी फेरीसाठी प्रति कि.मी. प्रति प्रवासी १४५ पैसे

या व्यतिरिक्त वस्तू व सेवाकराची आकारणी करण्यात यावी. अंतिम आकारणी रु. ५/- च्या पटीत करण्यात यावी.

१४. अतिरिक्त चालक देणे - अनेक वेळा आंतरराज्य मार्गावरील अथवा अतिलांब अंतराच्या विशेष बससेवेकरीता २ चालकांची मागणी करण्यात आल्यास दुसऱ्या चालकाचे वेतन व इतर सर्व भत्ते पक्षकाराकडून वसूल करण्यात यावेत.

१५.अनामत रक्कम - सर्व प्रकारचे विशेष बस सेवेचे आरक्षण स्वीकारताना वर नमूद सर्व आकार परिगणीत करून होणाऱ्या एकूण आकारणीय रक्कमेच्या २० % अतिरिक्त रक्कम अनामत रक्कम म्हणून घेण्यात यावी.

१६.आंतरराज्य कराराबाबत करावयाची कार्यवाही - पक्षकाराकडून आंतरराज्य मार्गावरील प्रवासासाठी विशेष बससेवेची मागणी आल्यास खालीलप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

१६.१ सामान्य स्थायी आदेश क्र.१२०१ दिनांक ०१.०३.१९७२ चा परिच्छेद क्र. १६ मध्ये नमूद केल्यानुसार इतर राज्यातील प्रवेशाकरिता तसेच इतर सर्व कर याबाबतची माहिती पक्षकारास उपलब्ध करून देण्यात यावी. आंतरराज्य मार्गावर भराव्या लागणारे वाहन कर, प्रवासी कर व इतर कर परिगणीत करून पक्षकाराकडून घेण्यात येणाऱ्या अनामत रकमेमध्ये त्याचा समावेश करावा.

१६.२ आंतरराज्यात  होणार इंधनाचा खर्च प्रथमतः पक्षकारास करावा लागेल.प्रवास पूर्ण झाल्यानंतर पक्षकारास इंधन खर्चाच्या पावत्या सादर कराव्या लागतील.अंतिम देयकातून सदरचा खर्च वळता करण्यात यावा.

१६.३ आंतरराज्यात  लागणार खास परवाना (Special Permit)संबंधित विभाग नियंत्रक उपलब्ध करून देतील,मात्र त्याचे शुल्क पक्षकारास भरावे लागेल.

१६.४ चांगल्या सुस्थितीतील बस आरक्षित विशेष बससेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल,परंतु परराज्यात मार्गात काही बिघाड झाल्यास बस दुरुस्त करण्याचा खर्च प्रथमतः पक्षकारास करावा लागेल.आणि प्रवास पूर्ण झाल्यावर अंतिम देयकातून हा खर्च वळता करण्यात येईल.

१६.५ आंतरराज्य मार्गावर विशेष बससेवा उपलब्ध करून देताना अटींच्या व शर्तींच्या अधीन राहून व या अटी मान्य असल्याचे पक्षकाराकडून लिहून घेतल्यानंतर योग्य त्या अनामत रक्कमेचा भरणा करून घेऊन आंतरराज्य मार्गावर विशेष बससेवा आरक्षण स्वीकारण्यात यावे.

१७.इतर सर्वसामान्य अटी -

१. परिपत्रकात वर नमूद अटी व शर्तींव्यतिरिक्त विशेष बसेस उपलब्ध करून देताना सामान्य स्थायी आदेश क्र. १२०१ (सुधारित) दिनांक ०१.०३.१९७२ व तदनंतर वेळोवेळी प्रसारीत करण्यात आलेल्या सर्वसामान्य इतर अटी व शर्ती लागू राहतील.

२. विशेष बस उपलब्ध करून देणेसाठीचे नियम,अटी व शर्तीची माहिती पक्षकारास फॉर्मसोबत उपलब्ध करून देण्यात यावी.

 

 

Picture
  • Welcome to the Maharashtra State Road Transport Service Support System
Picture

How may I help You?
Please Select from Below

File a complaint Departments Sugestion Related to the Website FAQ
For any other queries kindly contact our customer care number. टोल फ्री हेल्पलाईन : १८०० २२ १२५० Thank You