नागरिकांना त्यांच्याकडील वस्तू / सामान एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जलदरित्या पाठविण्याकरिता एस.टी. महामंडळांच्या यंत्रणेचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्यास, महामंडळांसही अधिकचे उत्पन्न प्राप्त होते. ही बाब विचारात घेऊन सुरुवातीच्या कालावधीपासून प्रवासी वाहतूकीसमवेत पार्सल वाहतूक सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेकरिता महामंडळांने संपूर्ण राज्याकरिता एकमेव खाजगी एजंटची नियुक्ती केलेली असून पार्सलसेवा वाहतूकीचे दर ठरविणे व इतर अनुषंगिक अधिकार खाजगी एजंटांना देण्यात आलेले आहेत.
महामंडळांच्या सर्व प्रमुख बसस्थानकांवर पार्सल कार्यालये कार्यान्वित असून त्याद्वारे नागरिकांना सक्षम पार्सलसेवा पुरविण्यात येते.
रा.प. महामंडळांमार्फत रस्ता प्रवासी वाहतूकीबरोबर बस गाडयांच्या रिकाम्या टपांवर / बस स्थानकावरील उपलब्ध जागेचा वापर करुंन पार्सल वाहतूक योजना राबविली जात होती. रा.प. महामंडळं स्वतः चालवित असलेली पार्सल वाहतूक सेवा कर्मचाऱ्यांचा वापर करुन राबविण्याऐवजी जाहीर निविदा पध्दतीने खाजगी व्यावसायिक संस्थेस / व्यक्तिसᅠपार्सल कुरियर वाहतूक सेवा रा.प.बसेसव्दारे करण्यासाठी तीन वर्षे कालावधीसाठी मे.किसनलाल गेहीराम आणि कंपनी यांचे अधिकृत प्रतिनिधी गुनिना कमर्शियल प्रा.लि.सावकार पेठ,यवतमाळ - ४४५००१ दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२४५३५१ ई मेल आय डी - kisanlalgehiram@gmail.com यांची पार्सल कुरियर वाहतुकीकरीता परवानाधारक म्हणून नियुक्ती केली आहे.