दुर्गम आदिवासी भागाचा थेट रस्ते वातुकीद्वारे संपर्क व्हावा यासाठी ज्या रस्त्यांवर ५० आसनी बस चालनात येऊ शकत नाही तेथे ३१ आसनी यशवंती (मिडी) बस सेवा सुरु करुन सामाकि बांधिलकीची जाण ठेवून दुर्गम भागाचा विकास करण्यास हातभार लावण्याकरिता यशवंती (मिडी) बसेस प्रायोगिक तत्वावर चालनात आणलेल्या आहेत. मिडी बसेसची लोकप्रियता व मागणीचा विचार करता, किफायतशीरपणा तपासण्याच्या हेतूने तसेच अवैध प्रवासी वाहतुकीस शह देण्याकरिता आणखी यशवंती (मिडी) बसेस घेण्यात आलेल्या आहेत.
आजमितीस महामंडळांत एकूण ३१ यशवंती (मिडी) बसेस चालनात आहेत.