Welcome to MSRTC   Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत

निरनिराळे उपाय योजून सुध्दा जर अपघात घडल्यास त्यात दुर्दैवाने सापडलेल्या अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत ( आर्थिक व वैद्यकीय ) देण्यात येते़. राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांना झालेल्या अपघातातील अपघातग्रस्तांना प्राथमिक वैद्यकिय मदतीशिवाय जरुर भासल्यास अपघात स्थळापासूनच्या जवळच्या जिल्हा परिषद दवाखाना, म्युनिसिपल दवाखाना, वुत्र्टीर दवाखाना विंत्र्वा शासकिय दवाखाना येथे उपचारासाठी दाखल करण्यात येते़. वैद्यकीय सल्ल्यानुसार एका दवाखान्यातुन दुस-या दवाखान्यात जेथे चांगली वैद्यकीय मदतीची सोय आहे तेथे दाखल करण्यात येते़. अपघातग्रस्तांना दवाखान्यात जेवण, चहा, फराळ, महामंडळ पुरविते वैद्यकिय सल्ल्यानुसार अपघातग्रस्तांना औषधे पुरविण्यात येतात. अपघातग्रस्तांना आर्थिक तात्कालिक मदत राज्य परिवहन वाहन अपघातातील अपघातग्रस्तांना (तृतीय वाहनातील व्यक्ती सोडून) खालीलप्रमाणे आर्थिक तात्कालिक मदत त्वरीत देण्यात येते़.

1) जखमी व्यक्तीना ₹ 500/- ते ₹ 1000/- पर्यंत त्यांना झालेल्या जखमांच्या स्वरुपात.
2) मृतांच्या नातेवाईकांना ₹ 10,000/-.

आर्थिक तात्कालिक मदतीची रक्कम अंतिम नुकसान भरपाईच्या रकमेतून वजा करण्यात येते़.

अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई

राज्य परिवहन वाहनांना झालेल्या अपघातातील अपघातग्रस्तांना खालीलप्रमाणे नुकसान भरपाईदेण्यात येते विशेष म्हणजे अपघात नुकसान भरपाईदेताना अपघाताबाबत महामंडळाचे कायदेशीर उत्तरदायित्व, व्यक्तीची अर्थार्जनाची क्षमता, लिंग, वय इत्यादि बाबीं विचारात न घेण्याचे ठरविले़ ज्या राज्य परिवहन विभागाचे अपघातग्रस्त वाहन असेल त्या विभागाचे विभाग नियंत्रक अपघात नुकसान भरपाईरक्कम मंजूर करुन अदा करणारे सक्षम प्राधिकारी आहेत.

महामंडळ ठराव क्रमांक २०१६.०४.०७ दि.०१.०४.२०१६ वाहतूक खाते परिपत्रक २०/२०१६ अनुसार हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजने अंतर्गत दि.०१.०४.२०१६ पासून रा.प.बसेसच्या अपघातातील मृत / जखमी व्यक्तींना खालीलप्रमाणे आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येते.

अ) राज्य परिवहन प्रवाशांसाठी

  तपशील रक्कम
प्रवाशाचा मृत्यु ₹ १०,००,०००/-
प्रवाशाला कायम स्वरुपाच्या विकलांगतेत पर्यवसन होणारी दुखापत ₹. ५,००,०००/- पर्यंत
कायम स्वरुपाच्या विकलांगतेत पर्यवसन होणारी अंशतः दुखापत ₹ २,५०,०००/- पर्यंत
तात्पुरत्या विकलांगतेत पर्यवसन होणारी दुखापत ₹ १,००,०००/- पर्यंत

(विकलांगतेच्या कालावधीनुसार रकमेत फरक होईल).
 

ब) तृतीय पक्ष वाहनातील व्यक्तीसाठी

(महामंडळ ठराव ९५.०९.१७ दिनांक १२.०९.१९९५, अंमंलबजावणी १४.११.१९९४ पासून) मोटार वाहन कायदा, 1988, कलम 140 मधील सुधारणा झाल्यानंतर दोन वाहनांचा अपघात झाला तर दोन्हीही मोटार वाहन मालक अपघात नुकसान भरपाईदेण्यास जबाबदार आहेत. या तत्वानुसार तृतीय पक्ष वाहनाबरोबर झालेल्या अपघातात तृतीय पक्ष वाहनातील व्यक्तीना कायद्यातील तरतुदीची निम्मी रक्कम, राज्य परिवहन महामंडळ नुकसान भरपाईम्हणून देते़.

1. तृतीय पक्ष वाहनातील व्यक्तीचा मुत्यु - ₹ २५,०००/-
2. तृतीय पक्ष वाहनातील व्यक्तीला कायम - ₹ १२,५००/- स्वरुपाच्या विकलांगतेत पर्यवसन होणारी दुखापत

क)(1) दोष नसण्याच्या तत्वावर अपघात नुकसान भरपाई अदा करावयाचे दायित्व

(परिपत्रक क्रमांक २०/२०१६ क्र.रा.प./वाहन/अप/७४७८ दि.०७.१०.२०१६. नुसार दि.०१.०४.२०१६ पासून) पादचारी, सायकलस्वार, हातगाडी चालक, सायकल रिक्षामधील व्यक्ती, प्राण्यांनी वाहून नेणा-या गाडीतील व्यक्ती इत्यादि तसेच स्थिर / अस्थिर मालमत्ता यांच्या बरोबर झालेल्या अपघातास जर राज्य परिवहन चालक जबाबदार नसेल ( दोष नसण्याच्या तत्वावर नुकसान भरपाई अदा करण्याचे दायित्व ) तर अपघात नुकसान भरपाईरक्कम मोटार वाहन कायदा, 1988 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार म्हणजे पुढील प्रमाणे देण्यात येते़.

(अ) मृत्यु प्रकरणी ₹ ५०,०००/-
(ब) कायमस्वरुपी विकलांगता ₹ २५,०००/-
(क) स्थिर/अस्थिर मालमत्तेचे नुकसान ₹ ६,०००/-

दोष असण्याच्या तत्वावर अपघात नुकसान भरपाई अदा करावयाचे दायित्व पादचारी, सायकलस्वार, हातगाडी चालक, सायकल रिक्षामधील व्यक्ती, प्राण्यांनी वाहून नेणा-या गाडीतील व्यक्ती इत्यादि तसेच स्थिर / अस्थिर मालमत्ता यांच्या बरोबर झालेल्या अपघातास जर राज्य परिवहन चालक जबाबदार असेल ( दोष असण्याच्या तत्वावर अपघात नुकसान भरपाई अदा करण्याचे दायित्व ) तर अपघात नुकसान भरपाईरक्कम पुढील प्रमाणे देण्यात येते.

अ) मत्यू प्रकरणी ₹ १०,००,०००/-
ब) कायमस्वरुपी विकलांगता ₹. ५,००,०००/- पर्यंत
क) तात्पुरती विकलांगता ₹ १,००,०००/- पर्यंत
ड) स्थिर/आस्थिर मालमत्तेचे नुकसान ₹ १,००,०००/- पर्यंत

( नुकसानीच्या प्रमाणात )

वरील परिच्छेद ''अ'' व ''क'' (2) मध्ये दर्शविलेली नुकसान भरपाईरक्कम जर संबंधित व्यक्तीना स्विकारावयाची नसेल आणि जर त्यांनी जादा नुकसान भरपाईची मागणी वेत्र्ली असेल तर अशा मागणी संबंधी महामंडळाची कायदेशीर जबाबदारी लक्षात घेऊन निर्णय घेता येईल, यासाठी अशी विवादात्मक प्रकरणांची तपासणी वित्तिय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, महाव्यवस्थापक (वाहतूक) व उप महाव्यवस्थापक (विधी) यांचा अंतर्भाव असणारी अपघात समिती करते़ ही समिती मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने घालून दिलेल्या सर्वाधिक तत्वाच्या आधारे प्रत्येक प्रकरणावर अभ्यास करुन नुकसान भरपाईच्या रकमेची शिफारस करते़. या समितीने शिफारस केल्यानंतर रक्कम मंजूर करणारे सक्षम प्राधिकारी पुढीलप्रमाणे आहेत.

१) विभाग नियंत्रक ₹ १०,००,०००/- पर्यंत
२) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ₹ १०,००,००१/- ते ₹ १४,००,०००/-
३) अध्यक्ष ₹ १४,००,००१/- ते ₹ १६,००,०००/-
४) स्थायी सामिती/महामंडळ ₹ १६,००,०००/- पेक्षा जास्त
 

वरील परिच्छेद 'अ' व 'क' मधील मागणीकाराच्या अपघातास जर राज्य परिवहन चालक पुर्णतः जबाबदार असेल तर अशा अपघातातील प्रकरणांची तपासणीसुध्दा वर निरदेशित केलेली समिती करते़. नुकसान भरपाई मागण्यांसाठी सुधारित कार्यपध्दती (वारस दाखल्या ऐवजी क्षतिपूर्ती बंधपत्र) राज्य परिवहन बस अपघातात मृत पावलेल्यांची नुकसान भरपाईप्रकरणे वारस दाखल्या ऐवजी क्षतिपूर्ती बंधपत्रावर निकालात काढण्यासाठी खालील कार्यपध्दती जानेवारी 1987 पासून अंमलात आणण्यात आली़. खालील निर्दिष्ट केलेल्या मागणीकाराच्या नुकसान भरपाईप्रकरणी मागणीकाराने तहसीलदार / तत्सम प्राधिकारी यांचे समोर जनरल स्टँप पेपरवर क्षतिपूर्ती बंधपत्र पुरे करुन संबंधित राज्य परिवहन अधिका-यांकडे सादर करणे आवश्यक आहे. तसेच मागणीकार ज्या विभागाचा रहिवाशी असेल अशा ठिकाणच्या दोन प्रतिष्ठिीत व्यक्तीकडून (सरपंच / पोलीस पाटील / राजपत्रीत अधिकारी वगैरे) प्रमाणपत्र हजर करणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रामध्ये संबंधित मागणीकार हा त्यांच्या परिचयाचा असून फक्त सदर इसमच संदर्भित नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे नमूद केले पाहिजे

1) अपघातात मयत झालेल्याची विधवा पत्नी
2) अपघातात मयत झालेल्या विवाहीत स्त्रिचा पती
3) अपघातातील मयत झालेल्या अविवाहीत मुलाचे वडील
4) अपघातातील मयत झालेल्याचा जेष्ठ मुलगा अथवा आविवाहीत जेष्ठ मुलगी (जर मृताची पत्नी / पती पुर्वीच मयत असेल तर) नुकसान भरपाईच्या बाबतीत अशा त-हेचे उदार मानवतावादी धोरण स्विकारणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे भारतातील पहिलेच महामंडळ आहे.अपघातग्रस्तास मंजूर करण्यात आलेली अपघात नुकसान भरपाईमान्य नसल्यास व त्याने ताशी वाढीव मागणी केल्यास अशा विवादात्मक प्रकरणांची तपासणी वित्तिय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी,महाव्यवस्थापक (वाहतूक),व उप महाव्यवस्थापक (विधी) यांचा अंर्तभाव असणाऱ्या अपघात समितीच्या शिफाराशीनुसार सदर रक्कम मंजुर करणारे सक्षम प्राधिकारी
अनु़. क्रमांक पदनाम मदतीचा तपशिल कोणत्या कायदया / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार मुदत
विभाग नियंत्रक ₹ १०,००,०००/- पर्यंत वाहतूक खाते परिपत्रक क्रमांक २०/२०१६ दि़. ०७.१०.२०१६ अन्वये संपुर्ण व उचित कागदपत्रे दाखल केल्यानंतर ३ महिन्याचे आत
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ₹ १०,००,००१/- ते ₹ १४,००,०००/- पर्यंत वाहतूक खाते परिपत्रक क्रमांक २०/२०१६ दि़. ०७.१०.२०१६ अन्वये संपुर्ण व उचित कागदपत्रे दाखल केल्यानंतर ३ महिन्याचे आत
अध्यक्ष ₹ १४,००,००१/- ते ₹ १६,००,०००/- पर्यंत वाहतूक खाते परिपत्रक क्रमांक २०/२०१६ दि़. ०७.१०.२०१६ अन्वये संपुर्ण व उचित कागदपत्रे दाखल केल्यानंतर ३ महिन्याचे आत
स्थायी समिती/महामंडळ ₹ १६,००,०००/- पेक्षा जास्त वाहतूक खाते परिपत्रक क्रमांक २०/२०१६ दि़. ०७.१०.२०१६ अन्वये संपुर्ण व उचित कागदपत्रे दाखल केल्यानंतर ३ महिन्याचे आत
Picture
  • Welcome to the Maharashtra State Road Transport Service Support System
Picture

How may I help You?
Please Select from Below

File a complaint Departments Sugestion Related to the Website FAQ
For any other queries kindly contact our customer care number. टोल फ्री हेल्पलाईन : १८०० २२ १२५० Thank You