माहिती व तंत्रज्ञान खात्याचा इतिहास
ऑनलाइन बुकिंगसाठी येथे क्लिक करा; ऑनलाइन बुकिंग
महाराष्ट्र शासनाने RTI अॅक्ट १९५० परिशिष्ठ ३ मधील तरतूदीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना संपूर्ण राज्यभर प्रवाशी वाहतूक सेवा पुरविण्यासाठी केली. रा.प. महामंडळाची सेवा हि महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून ओळखली जाते.
सुरवातीच्या काळात महामंडळाचे कामकाज मनुष्य बळाव्दारे हाती केले जात होते. सन १९७१ मध्ये महामंडळात संगणकीकरणाची सुरवात करण्यात आली. यासाठी संगणित्र केद्र हि नविन शाखा उघडण्यात आली. नंतरच्या काळात जगभर आणि आपल्यादेशात विविध बाबीचे संगणकीकरणाची वाटचाल सुरु होती़. महामंडळात सुध्दा संगणकाव्दारे आगाउ आरक्षण प्रणाली १९८७ साली कार्यान्वित करण्यात आली. तसेच वाहक मार्ग संक्षेप ( Conductor Way Bill Abstract ) प्रणाली ५२ आगारात राबविण्यात आली. याबरोबरच वाहकाची रात्रवस्ती अनामत रक्कम प्रणाली (Conductor Night Out Deposit ) मुंबई, पुणे व चिपळूण ईत्यादी आगारात प्रस्थापित करण्यात आली.
सन २००८ साली अगोदरची आगाउ आरक्षण प्रणाली व वाहकाचे मार्ग संक्षेप प्रणाली बदलून त्याजागी आधुनिक इलेक्ट्रॉनिक मशीन व्दारे तिकीट देण्याची प्रणाली व वेब बेस्ड आगाउ आरक्षण प्रणाली ( ETIM & ORS ) प्रस्थापित करण्यात आली. या बरोबरच RFID तंत्रज्ञानावर आधारीत स्मार्ट कार्ड प्रणाली टप्याटप्याने राबविण्यात आली. या प्रणालीव्दारे (RFID) वेगवेगळया प्रकारचे पासेस जसे की आवडेल तेथे प्रवास, मासिक / त्रैमासिक व विद्यार्थी सवलत पासेस वितरीत करण्यात येतात.
महाराष्ट्र शासनाने विविध खात्यात व शासकीय उपक्रमांत ई- गर्व्हनन्सची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली़. शासनाने राज्याच्या संगणकीकरणाच्या गरजा भागविण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान खात्याची निर्मिती केली. या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन २०१४ साली संगणक केद्राचे नामकरण माहिती व तंत्रज्ञान विभाग असे केले आहे. वित्तीय सललागार व मुख्य लेखाधिकारी हे या विभागाचे खातेप्रमुख आहेत.
माहिती आणि तंत्रज्ञान खात्याची संरचना
माहिती व तंत्रज्ञान केंद्रात खालील कामांचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे.
- अ) भांडार सामुग्री नियंत्रण
- ब) भविष्य निर्वाह निधीचा हिशोब
- क) मुदत ठेवी योजना
- ड) उपदान व्यवहाराचा हिशोब
- इ) मध्यवर्ती कार्यशाळेंच्या कामाचे परिव्ययांकन
- फ) वाहनांचा हिशोब व कामगिरीचे विश्लेषण
- ग) आर्थिक पृथःकरण, अंतर्गत व्यवहाराचा हिशोब
- ह) पगारपत्रके मध्यवर्ती कार्यालय, मुंबई व मध्यवर्ती
कार्यशाळा , दापोडी, पुणे
- ई) निकामी टायर्सचे विश्लेषण
संगणकीकरणाच्या महत्वपूर्ण योजना पुढीलप्रमाणे
राज्य परिवहन प्रवाशांना संगणीकरण आगाऊ तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध करुंन देणे व वाहकांमार्फत देण्यात येणा-या तिकीटांसाठी इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यु मशिनचा वापर हा महत्वाकांक्षी प्रकल्प “बांधा, वापरा व हस्तांतरण ” बी ओ टी तत्वावर अंमलात आणण्यासाठी मे. ट्रायमॅक्स आय टी इन्फ्रास्ट्रक्चर ऍन्ड सर्व्हिसेस लि मुंबई यांची पाच वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंटरनेट द्वारे ई तिकीट सुविधा मे. एच डी एफ सी बँक आणि इंडिया आईडीयाज.कॉम लि यांच्या पेमेंट गेटवे मार्फत प्रवाशांना उपलब्ध करुंन देण्यात आली. या सुविधे व्दारे प्रवाशाला नेट बॅकिग र्कैंडीट कॅश कार्ड वापरुन ई तिकीट आरक्षण करता येते.
ई् तिकीटांसाठी सुमारे ११,३८,२९९ प्रवाशांनी महामंडळांकडे नोंदणी केलेली आहे मे. ऍटम टेक्नॉलॉजीस लिमिटेड, मुंबई यांच्या सहयोगाने भमणध्वनी व्दारे “मोबाईल'' ई तिकीट आरक्षणाची सुविधा देखील प्रवाशांना उपलब्ध करुंन दिलेली आहे. याच बरोबर ई तिकीट काढणा-या प्रवाशांना आरक्षित केलेल्या तिकीटा बददलची माहिती लघुसंदेश व्दारे ( एस एम एस ) पाठविण्यात येत आहे. सदरची माहिती गाडी सुटण्याच्या ४ तास अगोदर पुन्हा पाठविण्यात येते.
संगणकीकृत आगाऊ आरक्षण सुविधा महामंडळांने नियुक्त केलेल्या २२३ अधिकृत खाजगी एजंटव्दारे देखील उपलब्ध करुन दिलेली आहे. महामंडळांतील सर्व २५० आगारांत इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यु मशिनचा वापर व ३२६ बस स्थानकांवर संगणकीक़त आगाऊ आरक्षण सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
वाहकाची रात्रवस्ती रक्कम भरणा
रात्रवस्ती व चालक, वाहक बदलीच्या ठिकाणी वाहकाजवळील तिकीट विक्री भरणा घेऊन, त्याची पोच पावती संगणकाव्दारे देण्याची कार्यपध्दती निवडक ठिकाणी कार्यान्वित आहे. सदर कार्यपध्दत आषाढी पंढरपूर यात्रेसाठी देखिल राबविण्यात येते.
स्मार्ट कार्ड
स्मार्ट कार्डाचे दोन प्रकार आहेत
- १. पी टाईप - याचा उपयोग मासिक / त्रैमासिक / आणि सर्व प्रकारच्या विद्यार्थी सवलतीसाठी केला जातो
- २. टी टाईप - याचा उपयोग आवडेल तेथे प्रवास ( ४ दिवस / ७ दिवस ) यासाठी केला जातो.
स्मार्ट कार्डाची सुविधा महामंडळाच्या सर्व आगारामध्ये राबविण्यात आली आहे
माहिती व तंत्रज्ञान विभाग परिपत्रक :-