संगणकीय व इंटरनेट व्दारे आरक्षण सुविधा :
प्रवासी जनतेच्या सेवेसाठी रा.प. महामंडळांने स्वतःचे १२३ ठिकाणी संगणकीय आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याशिवाय विविध शहरात एकूण १२२ खाजगी संगणकीय आरक्षण केंद्रे कार्यान्वित करण्यास परवाने देण्यात आलेले आहे. दिनांक ०८.०१.२०१० पासून रा.प. महामंडळांतर्फे प्रवाशांना इंटरनेट व्दारे आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळें प्रवाशांना घर बसल्या संगणकावरुंन व इंटरनेट सुविधा असलेल्या भ्रमणध्वनीव्दारे रा.प.बसेसचे आरक्षण सुविधा उपलब्ध झालेली आहे. सदर सुविधा msrtc.maharashtra.gov.in अथवा www.msrtcors.com या संकेत स्थळांवर उपलब्ध होऊ शकेल. तसेच रा.प महामंडळाच्या मोबाईल अँप द्वारे देखील आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
रा. प. महामंडळाने विविध कारणांस्तव प्रवाशांनी प्रवास रद्द वेत्र्ल्यास प्रवाशांना प्रवासभाडे रक्कमेचा परतावा देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. सामान्य स्थायी आदेश क्र. १०२८, दिनांक ०३/१२/१९७९ मध्ये पव्रासी रक्कमेच्या परताव्याची टक्केवारी व परतावा देण्याची कार्यपध्दती विस्तृतपणे नमूद केलेली आहे. पुसट खराब झालेल्या, फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या आगाऊ आरक्षण तिकीटावर परतावा मिळणार नाही़ वरील परताव्याचे दर सर्व प्रकारच्या बस सेवा प्रकारांना लागू राहतील. तसेच परताव्याच्या रकमेची आकारणी नजिकच्या रुपयात करण्यात यावी़ सामान्य स्थायी आदेश क्रमांक १०२८, दिनांक ०३/१२/१९७९ मधील परताव्या संदर्भातील इतर तरतुदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही़ इतर तरतुदी पुर्वीप्रमाणेच लागू राहतील. दिनांक १०.०६.२०१७ पासून सामान्य स्थायी आदेश क्रमांक १२०० दिनांक १०.०३.२००८ कलम क्रमांक ३.१ मध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.
१. बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या २४ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द केल्यास मूळ प्रवासभाड्यातुन १० टक्के रक्कम वगळून उर्वरित रक्कम + अपघात सहाय्यता निधी एवढी रक्कम परतावा म्हणून करण्यात येईल.
२. बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या १२ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द केल्यास मूळ प्रवासभाड्यातुन २५ टक्के रक्कम वगळून उर्वरित रक्कम + अपघात सहाय्यता निधी एवढी रक्कम परतावा म्हणून करण्यात येईल.
३. बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ०४ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द केल्यास मूळ प्रवासभाड्यातुन ५० टक्के रक्कम वगळून उर्वरित रक्कम + अपघात सहाय्यता निधी एवढी रक्कम परतावा म्हणून करण्यात येईल.
४. बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ०४ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द करता येईल त्या कालावधी नंतर आरक्षित तिकीट रद्द करता येणार नाही.
५. तिकीट रद्द करण्याकरिता कोणताही आकार ( रद्दीकरण आकार )घेण्यात येणार नाही.( पूर्वी जो कलम ३.२ मधील (i) व तरतुदी प्रमाणे ०.५० पैसे व रु.१.०० आकारण्यात येत होता)
६. पुसट,खराब झालेल्या,फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या आगाऊ आरक्षण तिकिटावर परतावा मिळणार नाही.
७. प्रवाशाने स्वतः तिकीट रद्द केल्यास आगाऊ आरक्षण आकाराचा परतावा मिळणार नाही.
टीप : नियोजित सुटण्याची वेळ म्हणजे मूळ ठिकाणा पासून ( बस स्थानक ) सुटण्याची वेळ.